आजीवन / Life Time Subscription Remedies




➤नुकसानदायक वास्तु दोष निवारण

घरातील वास्तु बाधेवर खालीलप्रमाणे विनाखर्चिक उपाय केल्यास नकारात्मक उर्जेपासुन आपला बचाव होतो. संबंधित कृती टप्याटप्याने करावी.

१. भाजी मार्केटला शनिवारी अथवा मंगळवारी जाऊन ' कोव्हळा ' नावाचे पपईच्या आकाराचे म्हणजे दोन मुठ आकाराचे हिरव्या रंगाचे फळ घरी घेऊन यावेत. सोबत एक मीटर लाल कपडा घ्यावा.



२. घरी फळ आणल्यास बेसीनच्या नळाखाली कोव्हळा स्वच्छ धूवुन घ्यावा व सोबत आणलेल्या लाल रंगाच्या कपड्यात बांधुन स्वयंपाक घराच्या सेलिंगला असलेल्या पंखा लटकवण्याच्या हुक ला टांगावा.

३. घरात नकारात्मक उर्जेचे प्रमाण अधिक असल्यास अतिरिक्त कोव्हळा लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधुन आपल्या बेड रुम व प्रवेश दरवाज्याच्या आतल्या बाजूसही बांधावा.


ह्या प्रयोगाचा फायदा कसा होतो. घरावर किंवा दुकानावर झालेली नकारात्मक उर्जा कशी बघु शकाल ?

१. कोव्हळा बांधल्यास दर दोन ते तीन दिवसांनी तो हलकासा दाबुन तपासावा. अशाप्रकारे स्वता चाचणी घेत राहावी. यातुन दोन अनुभव येतील...


  • अ. कोव्हळ्याला जर पाणी सुटलं असेल तर अतिशय घाणेरडा दुर्गंध येतो. याचा अर्थ असा की घरात अथवा दूकानात लपलेली नकारात्मक उर्जा तुम्ही लटकवलेल्या फळात शोषली गेली व फळ नासले. अशा परिस्थितीत ते फळ घाणेरड्या पाण्याने चिघळल्यास ; त्वरीत खाली उतरवुन दहि भात नैवेद्यासोबत चार रस्त्यावर अथवा वाहत्या पाण्यात सोडुन घरी यावेत.
  • ब. कोव्हळ्याला दर दोन ते चार दिवसात तपासुन पहावेत. अशा परिस्थितीत जर कोव्हळा टणक व पांढरापट्ट दिसत असल्यास तुमच्या वास्तुत उर्ध्वगामी नकारात्मक उर्जा नाही असं समजावं व कोव्हळा बदलण्याची तात्काळ गरज नाही.


परंतु दर आठवड्यास कोव्हळा तपासावा. जेव्हा कधीही नकारात्मक उर्जा वास्तुत प्रवेश करेल त्यावेळेस टणक व पांढरापट्ट कोव्हळा ही घाणेरड्या पाण्याने युक्त होऊन नासतो... अशा वेळी वरील ( अ ) मधे सांगीतालेली क्रिया करावी.


महत्त्वाची सुचना :

जेव्हा जेव्हा नासलेला कोव्हळा सोडून घरी परताल तेव्हा त्याच आठवड्याच्या मंगळवारी किंवा शनिवारी नवीन कोव्हळा घरात बांधा.


➤पुरातन नकारात्मक अघोर बाधेवर उपाय

आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर असल्यास अथवा करणीबाधेचा प्रभाव असल्यास अथवा घरातील सदस्य सतत आजारी पडत असल्यास हा उपाय करावा.


  • १.सर्वप्रथम बाजारात जाऊन किराणा मालाच्या दुकानातुन समुद्री पांढरे खडा मीठ किलोभर घरी घेऊन यावेत.
  • २. घरात जितक्या खोल्या असतील ( टोईलेट व बाथरुम सोबत ) तेथे काचेच्या छोट्या पारदर्शक ( विना रंगाच्या ) बाऊल मधे आणलेले मीठ ठेवावे.
  • ३.लहान मुलांच्या हातापासुन लांब अथवा उंचीवर सुरक्षित ठेवा. मुलांचा स्पर्श होता कामा नये हे लक्षात ठेवा.
  • ४. सर्व बाऊलमधे मीठाची मात्रा सरासरी ५०% ते ६०% ठेवावी. काटोकाठ मीठ भरु नये.



खडा मीठाचा काय व कसा परीणाम पाहू शकाल ?

वास्तुत सरपटणार्या नकारात्मक उर्जेला खारट तत्व तात्काळ खेचुन घेते. त्यायोगे ज्या मीठाने काळी उर्जा खेचली आहे त्या मीठाला त्या ठिकाणी पाणी सुटेल. अशा बाऊल मधील पाणीयुक्त मीठ टाँईलेट मधे टाकुन द्यावे. व नवीन मीठ भरुन परत त्याच जागी बाऊन ठेवावा.  आपण सर्व बाऊल दर दोन चार दिवसांनी तपासत राहावे.

ज्या बाऊल मधील मीठाला पाणी सुटलेले नाही ते मीठ बदलण्याची गरज नाही. या उपायाने घरातील व्यक्तींना हलकेपणाची जाणीव येईल. शरिरातील मरगळ काही अंशी कमी होईल.


➽ दर अमावस्या व पौर्णिमेला खालीलप्रमाणे उपाय करा.

लिंबु, दुर्वा, हिंग,खडा मीठ, तुळस पाने, भंडारा हळद ( खंडोबाच्या पाटा खालची ), गंगाजल, गुलाबजल, भस्म ( अग्निहोत्र / यज्ञकुंड / हवन )

वरील नऊ तत्वांन एकत्र करुन फिनेल तयार करा. ते एका बाटलीत भरुन ठेवा. दर अमावस्या व पौर्णिमेला दोन चमचे पाण्यात टाकुन घरातील सर्व जमीन ओल्या फडक्याने धुवून व पुसुन घ्या. या उपायाने नकारात्मक उर्जा घरात थांबत नाही.


➤देवारा शक्ती जागृतीकरण गुप्त माहीती

देवारा जागृत केल्याशिवाय घरात चैतन्यमयी दैवी सान्निध्य तयार होत नाही. या जागृतीकरणासाठी देवपंचायतनाची शास्त्रोक्त मांडणी असणे अनिवार्य आहे. या देव पंचायतनात खालीलप्रमाणे दैवी मंडळाचा समावेश अंतर्भुत आहे. मुर्ती उंची जास्तीतजास्त ४ अंगुल ईतकीच असावी हे लक्षात ठेवा.



ताटातील देव -


  • १. श्री गणपती
  • २. अन्नपूर्णा माता ... माहेरवाशीनीने दिलेली.
  • ३. बाळकृष्ण ... माहेरवाशीनीकडुन येणारी.
  • ४. शिवलिंग नंदिसहीत
  • ५. सव्वा रुपया सुपारी सोबत.



ताटाबाहेरील देव -

घरातील कुलदेवता, श्री स्वामी समर्थ ( दत्त ) महाराज, ग्राम देवता, आराध्य दैवत वगैरे प्रतिमा.

आपल्या उजव्या हातापासुन डावीकडील क्रमवार सुची खालील प्रमाणे समजुन घ्यावी.


  • १. तांबा व जल युक्त शेंडी नारळ
  • २. घंटी
  • ३. देवांचे ताट
  • ४. शंखयुक्य कासव .. शंखात दररोज थोडे पाणी घालावेत.
  • ५. दिवा प्रज्वलित असावा. ( तेल किंवा तुप यथाशक्ति )



➤आराध्य दैवत साधना ( कार्यसिद्धीहेतु )

त्वरीत अनुभव येऊन जीवन सुखी होईल. ईष्ट कार्यसिद्धी हेतु गुरुवारी सकाळी लवकर उठुन सचैल स्नानादि कर्मे करुन न शिवलेले वस्त्र ( पंचा वगैरे ) बांधुन देवा समक्ष बसावे. समोर पाठ ठेवुन त्यावर पिवळे कोरे नवीन वस्त्र अंथरुन श्री दत्त महाराजांची बसलेली सुंदर प्रतिमा / मुर्ती स्थापित करावी. प्रतिमा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसुन सुवासिक हिना अत्तर वापरुन इतरत्र शिंपडावे. मुर्ती असल्यास शहाळा अथवा नारळ पाणी अथवा पंचामृती स्नान घालुन गंध, धूप दिप व गोड नैवेद्य ठेउन मनोभावे श्री दत्त देवाची आरती मानस पुजेने करावी.

नंतर एका स्वच्छ पांढऱ्या कागदावर आपली परिस्थिती अनुकुल कामना हळदिच्या पाण्याने हळदिच्या गाठीने लिहावीत. अक्षरे पुसट असली तरी चालेल. या कागदालाही गंध फुले अर्पण करावीत. ही कृती आरती झाल्यावर करावी. नंतर श्री गुरुचरित्रातील खालील ओव्या ५२ वेळेला श्रद्धेने म्हणाव्यात...


ll उद्धरावया भक्तजना l अवतरलासी नारायणा l वासना जसी भक्तजना l संतुष्टावे तेणे परी l ऐसी तुझी ब्रीद ख्याती l वेद - पुराणी वाखाणिती l भक्तवत्सला श्रीगुरुमूर्ती l विनंती माझी परिसावी ll 

ही प्रार्थना झाली तर कागद श्री गुरुचरित्र पोथीत अथवा पोथी नसल्यास दत्त देवाचरणी एका डबीत व्यवस्थित घडी करुन ठेवावा. त्या गुरुवारी ' श्री दत्त ' नामस्मरणाद्वारे उपवास करावा. रात्री परत काही गोड नैवेद्याद्वारे महाराजांना साष्टांग नमन करुन उपवास प्रसन्न चित्ताने नामस्मरणात सोडावा.


➤3 दिवसीय पारायण कसे करावे

३ दिवसीय पारायण करण्याहेतु श्री दत्त क्षेत्री प्रस्थान करावेत. उदा. श्री क्षेत्र कुरवपुर, श्री क्षेत्र गाणगापुर इत्यादी. स्वगृही ३ दिवसीय पारायण करु नये. शारिरीक त्रासाचे प्रमाण अनपेक्षित रित्या अनुभवास येऊ शकते. अध्याय पठण क्रमवारी खालीलप्रमाणे आहे. इतर नियम सप्ताह वाचानाप्रमाणेच आहेत. त्यात वेगळ काही नाही. 


➤हरवलेले कुलदैवत पुन्हा प्राप्त करा

शिवतत्वाच्या अनुशंघाने योग्य कुलदैवत कुळाचार ( सगुण व निर्गुण ) कशा पद्धतीने ; कोणाच्याही मदतीशिवाय पुर्णत्वाला कसे पोहोचवता येईल; याहेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून कुलदैवत साधना व साध्य अतिदुर्लभ माहिती देत आहोत. 

शिवतत्वाच्या अनुशंघाने योग्य कुलदैवत कुळाचार ( सगुण व निर्गुण ) कशा पद्धतीने ; कोणाच्याही मदतीशिवाय पुर्णत्वाला कसे पोहोचवता येईल; याहेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून कुलदैवत साधना व साध्य अतिदुर्लभ माहिती देत आहोत.

कुलदैवत म्हणजे काय ?

संबंधित कुळातील ' मुळ पुरुष ' ( पुर्वजांपैकी ) सिद्धावस्थेद्वारा कुळात सर्वाभुत होणाऱ्या दैव आराधनेला परंपरागत घराणेशाही पद्धतीने ( गुरु - शिष्य परंपरा नाही ) कौटुंबिक कल्याणपुर्तीहेतु कुळपिंड अर्पण केलेल्या त्या मुळ पुरुष आधिष्ठित देवतेला कुळ वचनपुर्ती स्वगृही स्थापिले म्हणजे कुलदैवत...!

आपल्या घराण्यातील वंशावलीत मागील ३३ पिढ्या ज्यावेळी वरील तत्वाप्रमाणे धर्माचरण करतात तेव्हा त्या कुळदैवतेचा त्या कुळातील मुळ पुरुष उपरान्त ; त्या कुळाशी कुळपिंड, घराची वास्तु, पितरं व देहिक प्रकृतीशी प्रत्यक्ष सुक्ष्म संबंध प्रस्थापित होतो. हा ऋणानुबंधात्मक भाव पिढिजात जसाचा तसा जपल्यास घरातील सुख समृद्धी टिकुन राहातेच बरोबरच वृद्धींगतही होते. दत्तप्रबोधिनी तत्वाच्या माध्यमातून आपल्या घराण्यातील कुळदैवत योग्य प्रकारे साधनावलीत कशाप्रकारे सामावुन घेतले जाते यावर साधकांना पुर्वापारच मार्गदर्शन केले जाते.

ज्याक्षणी कोणताही संसारिक जीव मानसिक, शारिरीक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक कायाकल्पकतेकडे प्रस्थान करतो ; त्यावेळेस त्याला कुलदेवतेच्या आज्ञेची नितांत गरज असते अन्यथा मृगजळवादी भुमिका स्वतः भोवतीच गिरक्या मारते. कुलदैवतेकडुन प्रत्यक्ष आज्ञा येणं वेगळं व कुलदैवतेकडे कौल लावणं वेगळं... यात आकाश पाताळाचं अंतर आहे हे अधी समजुन घेतलं पाहीजे.

कुलदैवतेची उत्पत्ती कशी झाली ?

आज तुम्ही जेवढी कुलदैवते नावरुपाने ओळखता त्यात खंडोबा, धुळोबा, वेतोबा, नागोबा व ज्योतिबा ईत्यादी देवतांच्या नामाअंती " बा " चा उच्चार केला जातो कारण ही सर्व रुपे भगवान शिवाच्या श्री काळभैरवनाथाची प्रांतिय रुपे आहेत. ज्या ज्या प्रांतात देवाच्या भक्तांनी देवाला मोठ्या आवेशाने व भक्तीभावाने हाक मारली ; देव श्री काळभैरवनाथ त्या भक्ता स्वगृही जाऊन स्थिर झाला व काळांतराने त्या नाथयोग्यांच्या निर्वाणाने ते क्षेत्र "श्री क्षेत्र" म्हणुन उदयाला येऊ लागले. 

शिवतत्वाच्या अनुशंघाने योग्य कुलदैवत कुळाचार ( सगुण व निर्गुण ) कशा पद्धतीने ; कोणाच्याही मदतीशिवाय पुर्णत्वाला कसे पोहोचवता येईल; याहेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून कुलदैवत साधना व साध्य अतिदुर्लभ माहिती देत आहोत.

आज आपण ज्या कुलदेवतेला जातो अथवा मानतो ; ती सर्वे " श्री क्षेत्र " म्हणुन प्रथम वरील प्रमाणे उदयाला आली. दिर्घकाळानुरुप दिशा, देश व काळ गणनेप्रमाणे त्या त्या प्रांतिय कुळनिदेशक स्तरावर श्री कुलदेवत म्हणुन लोककल्याणास्तव प्रसिद्ध झाली.

कुलदैवत क्षेत्रिय वलानात येणाऱ्या घराण्यांचे सर्वस्व आत्मानुचरण त्या घराण्यातील मुळ पुरुषांच्या अभिवचनावर ते दैवत चालवते. योग्य पद्धतीने सत्वाचरण केल्यास चैतन्य अनुभवता येते तर दुष्कर्म केल्यास चाबकाचे फटकेही बसतात. आमच्या पाहाण्यात तर अशावेळी कुलदैवतेचे त्या घराण्यासाठी दरवाजेही बंद झालेले पाहीले आहेत. म्हणुन नीट वागा अजुन काय सांगू.

कुळवाद - घराणेशाही - निष्णात पिढ्या ही सांगड व्यवस्थित असेल तर कुलदैवतेकडुन आध्यात्मिक मार्गक्रमणाचे द्वार उघडले जातात. अशा आध्यात्मिक मार्गावर प्रस्थान करण्यासाठी सद्गुरुचरणकृपेची नितांत आवश्यकता असते. एकदा की सद्गुरु महाराजांनी आपली आत्मिक जबाबदारी स्वीकारली ; मग कुलदैवतेच्या सगुण व व्यक्तीविषयक आराधनेची गरज राहात नाही. 

सर्व कुलदैवते भगवान शिवाचेच स्वयंभु अवतार असतात जे सतत भ्रमंतीवलनपालक आहेत. फक्त आज झालेल्या घाणेरड्या बाजारीकरणाने आपल्याला कदाचित श्री कुलदैवत जाज्वल्य कळत नसवं ही शोकांतिका आहे. जर ईष्ट कुलदैवत साधक अपेक्षित सद्गुरु अनुग्रहीत आत्मावलोकन करण्यात सक्षमता दाखवत असेल तर त्याचे कुलदैवत त्याचा शोध घेत त्याच्यापर्यंत अवश्य त्याच्या घरात पोहोचल्याशिवाय राहाणार नाही ( जरीही कुलदेवत हरवलेले असले तरी )...हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 


➤विनाखर्च कायमस्वरुपी पितृदोष उपाय

वार्षिक श्राद्ध व्यतिरिक्त पितरांच्या आशीर्वादासाठी दर अमावस्येला करण्याचा एक सोपा विधी पुढे देत आहे  तो म्हणजे पितरांना तर्पण. 

हा विधी पुढीलप्रमाणे करावा. 

प्रथम आचमन व प्राणायाम करुळ अपसव्य करावे. ( म्हणजे डाव्या खांद्यावरचे जानवे उजव्या खांद्यावर घ्यावे ) नंतर भांड्यात काळे तीळ घातलेले पाणी घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्यावरुन पितरांना पुढील चार मंत्र म्हणत तर्पण करावे ( पाणी अंगठ्यावरुन ताम्हाणात सोडावे ) 

मंत्र 

ॐ आब्रम्हस्तंव पर्यन्तं देवर्षिपितृमानवाः l

तुप्यन्तु पितरः सर्वे मातृमातामहोदयः ll१ll

अतीतकुलकोटीनां सप्तद्विपनिवासिनाम् l

आब्रह्मभुवन्नाल्लोका दिदमस्तु तिलोदकम् ll२ll

ये S बान्धवा बान्धवा ये ये Sन्य जन्मानि बाधवाः l

ते सर्वे तृप्तिमायान्तु मया दत्तेन वारिणा ll३ll

ये के चास्मत्कुले जाता आपुत्रा गोत्रिणोमृताः l

ते गृहणन्तु मया दत्तं वस्त्रनिष्पीडनोदकम् ll४ll


अशा प्रकारे दक्षिण दिशेला तोंड करुन पितरांचे स्मरण करावेत. वार्षिक श्राद्ध विधी चालु ठेवुनच हा उपाय करावा.


➤आपला भाग्यांक ओळखा

DD/MM/YYYY जन्म दिवस + महीना + वर्ष  यांची एकुण बेरीजेला भाग्यांक म्हणतात. भाग्यांक त्या व्यक्तीच्या मुळांकापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो.

भाग्यांक 1असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • भाग्यांक 1 धारक व्यक्ती मुळातच नशीबवान असतात. अशा व्यक्ती उंच व सुडैल शरीरयष्ठी, आकर्षक प्रतिमायुक्त असतात. ते नेहमी कार्यकुशल असतात. नवनवीन कार्य करण्यासाठी अतीउत्सुक असतात.
  • बालपणापासूनच नेतृत्ववादी मानसिकता असते. त्यांच्या कार्य क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करतात. काही वेळी अनपेक्षित स्वभावामुळे विसंगत परिस्थितीत अडकुन त्रास सहनही करावा लागतो.
  • आर्थिक बाजु सामान्यतः चांगली असते. त्यांना धनार्जन कसे करायचे याचे परिपुर्ण ज्ञान असते. खर्चही मापक स्वरुपातच करतात. बचत करण्याची कला अवगत असते.
  • मित्रांचे मित्र असतात. त्रास सहन करुनही मैत्री खात्यात योगदान करतात. कामात व्यस्त असल्या कारणास्तव मित्रांना अपेक्षा वेळ देऊ शकत नाही. त्यांना ऐकांतवास आवडत नाही. नेहमी मैत्री वातावरणात राहायला आवडते. यशस्वी व्यावसायिक होऊ शकतात. अधिकारीक जबाबदारीच्या पदांवरही पदस्थ होण्याची पात्रता आहे.



भाग्यांक 2 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • भाग्यांक 2 असलेल्या व्यक्ती उत्तम वक्ते असतात. त्यांच्या वक्तेपणाला समर्थक असतात. त्यांचा हट्टी स्वभाव असतो. सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून सामान्य विषयही गुंतागुंतीयुक्त बनवतात.अशा माध्यमातून तर्क संगत विचारविनिमयाद्वारे लोकांच्या प्रशंसेला पात्र ठरतात.
  • त्यांचा मित्र परिवार असतो. समाजाच्या सर्व स्तरात त्यांची ओळख असते. त्यांच्या वयोमानापेक्षा जास्त मोठे ( वृद्ध ) व जास्त लहान वयातील मुलेही मित्र बनतात.
  • ते कधीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. त्यांची पत्नी / नवरा अशा व्यक्तींवर त्यांच्या बेजबाबदार विसंगत मनोवृत्तीला अनुसरुन नेहमी लक्ष ठेवतात. तरीही अशा व्यक्ती निष्काळजी व अजोड मानसिकतावादी राहातात. निसर्गतः ते चांगले व मनोरंजक असतात.
  • दुटप्पी जीवन जगतात. एक वैयक्तिक तर दुसरे सामाजिक. त्यांच्या वैयक्तिक जीवनात उतार नसतो. त्यांचे सामाजिक जीवन चांगले असते. त्यात कोणीही टिका करत नाहीत.
  • त्यांच्याजवळ अनेक उपजीविकेचे साधने असतात. त्यांना पैसे कमवणे व टिकवण्याची कला असते.
  • अशा व्यक्ती डाँक्टर, पाण्याशी निगडीत कामे, शेतीयुक्त आणि रत्न विशेषज्ञ क्षेत्रात यश मिळवतात.
  • खोट्या संवेदनांपासुन अशा व्यक्तींनी सावध राहायला पाहीजे. चुकीची संगत नुकसान दायक आहे. जितके लांब राहाल तितकेच आनंदी व सुखी राहाल.



भाग्यांक 3 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • असे व्यक्ती अतिआकांक्षायुक्त असतात. त्यांना सर्वश्रेष्ठ होण्याची तीव्र उत्सुकता असते पण परिस्थिती अनुकुल नसते. जीवनात बर्याच अडचणींना सामोरे जावे लागते. संयमी स्वभावाने उद्दिष्ट साध्य करतात.
  • अशा व्यक्ती दुर्दैवातुनही योग्य मार्ग काढुन प्रतिकुल परिस्थितीत येण्याची कला जोपासतात. त्यांना निष्क्रिय राहाणे रुचत नाही. त्यांना कामात गुंतुण राहाणे आवडते.
  • अशा व्यक्ती मित्रसंगतीत वेळ वाया घालवत नाहीत. नेहमी काहीतरी धनार्जनासाठी नवनवीन योजना आखतात. मित्र मोजक पण पैसे जास्त कमवतात. पैशांना जास्त महत्व देतात. समाजात मोजक असुनही सामाजिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात. आर्थिक परिस्थितीत प्रगती मंद असते.जे करतात ते शाश्वत करतात.
  • त्यांची प्रकृती स्थिर असते. छोट्या रोग विकारांवर आतिशयोक्ती करतात त्यात पोटाचे विकार, अपचन पाहाण्यात येतात. कपडा व्यवसाय, तारण ठेवण्याचे दुकान यात यशस्वी होतात. निरीक्षण करण्याची शक्ती उच्च कोटीची असते. ते प्रत्येक गोष्ट विषय मुळापासुन समजुन घेतात.



भाग्यांक 4 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • हा भाग्यांक शांत व सुस्वभाव दर्शवतो. अशा व्यक्ती संयमी व कधीही परिस्थिती अनुसरुन भरकटत नाहीत. गंभीर स्वभावाचे व्यक्ती असतात. लोकं त्यांच्या कार्यात नाहक टिका करतात पण कोणतीही चुकी दिसुन येत नाही.
  • नवीन कामात सहभागी होऊन काम पुर्णत्वाला घेऊन जातात. संशोधक वृत्तीतुन विषयात खोल उतरतात. उच्च विचारसरणी व परीसंवाद अर्थपुर्ण असतो.
  • अनियोजीत कामे कधीही करत नाहीत. योजनापुर्वक आराखडा करुनच कामे हाती घेतात. भवितव्यत होणाऱ्या फायदा व तोट्याचे गणित चांगल्या प्रकारे अवगत करतात.
  • असे व्यक्ती नशीबवान आहेत कारण कितीही अनपेक्षित वा अपेक्षित अडचणी येऊनही एनायासे सहजच त्यातुन पुढे मार्गस्थ होतात. स्वभावतः ऐकांतवासी असतात. मर्यादित मित्रवर्ग व निवडक संख्या असते.
  • आरोग्य उत्तम व प्रकृती स्थिर असते. देह कारणात जागृत असतात. प्राध्यापक, ईंजीनियर लेखपाल ईत्यादीत यशस्वी ठरतात. योग्य मित्र वर्ग असल्यास अंतर्मुखीपणातुन बाहेर येऊन यथाशक्ति एकरुप होतात.



भाग्यांक 5 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • अशा व्यक्ती परिवर्तनशील असतात. सावध मनोवृत्ती असल्यामुळे नीरसा वातावरणात कोणत्याही कामात सहभागी स्वईच्छेने सहभागी होत नाही.एका ठिकाणी स्थिर होऊन काम करणे रुचत नाही. त्यांना सतत बदल अपेक्षित असतो.
  • त्यांच्या बाबतीत कोणीही काहीही खात्रीलायक काही सांगु शकत नाही कारक एक वेळा आनंदी तर काही क्षणात खिन्न असतात. ज्या क्षणी गंभीर असतात तेव्हा सहकारींसाठी अत्यंत क्लेशदायक ठरातात. आनंदी असताना अनपेक्षित फायदे करवुन देतात.
  • ठराविक जीवन शैलीत जगतात. त्यांची स्वतःची स्वतंत्र मानसिकता असते ज्यात कोणाचाही हस्तक्षेप अमान्य असतो. छोट्या गोष्टींमधे रुची नसते. मोठ्या योजनेत सहभागी होतात. ईतर कामे अपमानजनक वाटतात.
  • कामाची सुरवात उत्साहाने करतात पण अनपेक्षित नैराश्यामुळे हाती घेतलेले काम पुर्ण करताच सोडून देतात. अशी सोडलेली कामे परत हाती घेत नाहीत. यात लोकांना अविश्विसी स्वभाव दिसतो.
  • प्रवासाशी निगडीत कामात यशस्वी होतात. नातीगोतींमधे यांच्या वर निष्ठा कमी असते. नवीन नाती बनवण्यात रुची असते. भोगी विलासी जीवन आवडते. महागडी निवड असते. हाच स्वभाव जीवनात असंतुलन निर्माण करते.



भाग्यांक 6 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • हा भाग्यांक विश्वासकारक असतो. हे व्यक्ती  प्रामाणिक मित्र व योग्य सल्लागार असतात. व्यक्तीच्या आकलनशक्तीचा अंक आहे. संवेदनशीलता असुनही आचरण परिपक्व असते. निष्पाण मनोवृत्तीमय असुन विषयांती हुशारीचे दर्शक असतात. हे प्रशंसनीय आहे.
  • व्यवसायात यशस्वी असतात. भागीदारी सौद्यात चांगला नफा कमवतात. मित्र वर्गात प्रसिद्ध व कोणाकडुनही हुशारीने कामे करवुन घेतात.
  • ईतरांवर दबाबतंत्र वापरण्याचा वाईट स्वभाव असतो. त्यांचेच शब्द मानले व आमलात आणले पाहिजेत अशी समज ठेवतात. त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन स्वार्थ साधतात.
  • भोगीविलासी व उधळपट्टी स्वभाव असतो. स्वतःवर नियंत्रण नसते. मित्र वर्ग मदत असतात पण काही वेळा फसवणूक ही होते. त्याचा विशेष परिणाम होत नाही याऊलट फायदाच होतो.
  • सजावट, हाँटेल, पार्लर व रंगमंच कामात यशस्वी होतात. अशा व्यक्तींनी अर्थिक बाजु व्यवस्थित संभाळली पाहीजे. यातच त्यांचे हित आहे. आरोग्याविषयक काळजी घेतली पाहीजे.



भाग्यांक 7 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • हा भाग्यांक कसोटीकारक आहे. अशा व्यक्ती धैर्यवान व हिम्मत दाखवणार्या असतात. त्यांचे एकच उद्दिष्ट असते. अडचणी येऊनही हेतु साध्य करतात.
  • कधीही निराश होत नाहीत. जो संघर्ष करतात तो ईतरांच्या आकलन शक्ती पलिकडे असतो. कोणीही त्यांची पार्श्वभूमी ओळखु शकत नाही ज्यातुन त्यांनी यश प्राप्त केलेले असते.
  • त्यांना कोणाचाही त्यांच्या कामात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. त्यांचा निर्धार ठरलेला असतो. कोणाचेही सल्ले मानत नाहीत. कठोर निर्णायक असतात. अडचणींमधेही हसतमुख असतात. जीवन कसं जगावे याबाबात परिपुर्ण ज्ञान असते.
  • प्रकृति स्थिर असते. पोटाच्या विकारांनी ग्रसीत असु शकतात. मित्र वर्गाकडुन क्वचितच फायदा होतो पण अशा व्यक्ती मित्रांना मदत करतात.
  • अर्थिकदृष्ट्या 28+ कठोर परिश्रम असतात पण 36+ त्यांचा फायदा होऊ लागतो. पुढे श्रीमंत होतात. कठोर परीश्रम करणारे असतात. भाग्यांक 2 च्या व्यक्तींशी सोबत काम केल्यास भरघोस यश मिळवतील.



भाग्यांक 8 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • अशा व्यक्ती कोणतीही संधी व कोणतेही नवीन कार्य उमेदीवृत्ती जोपासात नाही. जे वर्तमान आहे तेच विश्रांतीकारक रुपात जगतात. त्यांच्यात काही रहस्ये नसतात. ते रहस्ये मानत नाहीत. अशा कामात कधीही यशस्वी होत नाहीत.
  • जीवनात सर्व गमवुन देखील निष्काळजी स्वभाव सोडत नाहीत. स्वप्नांच्या दुनियेत मग्न असतात. सर्वस्व आर्पणही करतात. किती व्यस्त आहेत हे जगाला दाखवतात पण ते मोकळेच असतात. काल्पनिक दुनियेत रमतात.
  • अशा व्यक्तींना शोर्टकट म्हणतात. त्यांना मोठी औपचारिक व अनौपचारिक क्रीया आवडत नाही. उद्याच्या परिणामांची पर्वा नसते. आजचा दिवस कसा ढकलायचा हेच चिंततात.
  • भोगीविलासी स्वभाव असतो. खा, प्या व मजा करा हा मुलमंत्र असतो. उधळपट्टी मानसिकता असते. मित्र वर्गावर आधारलेला असतो. आरोग्य चांगले व प्रकृती स्थिर असते. निष्काळजीपणा हा जीवनाची रुपरेषा असतो. लोकांशी जोडलेल्या व्यवसायात यशस्वी असतात.



भाग्यांक 9 असलेल्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व :


  • अशा व्यक्ती महान कार्यकारण व धैर्यवान स्वभावाला अनुसरुन असतात. स्वभाव रागीष्ट असतो. छोट्या मोठ्या विषयातही राग अनावर होत असतो. संवाद हा सर्वोत्तम गुण यांच्यात दिसुन येतो.
  • मध्यमवर्गीय घरात जन्मलेले असुनही उच्च पदस्थ होतात. कोणालाही "नाही" म्हणत नाहीत. संघर्षमय प्रवास प्रगतीकारक ठरतो. अडचणी, तक्रारी व ताप त्यांना थांबवु शकत नाही. परिवारातुन कमी पाठींबा मिळतो पण त्यांना खंत नसते.
  • मित्र बनवुन ; त्यांच्यावर स्वतःचा प्रभाव सोडतात. उच्चभ्रु लोकांशीही मैत्री ठेवतात. आरोग्य उत्तम असते. रक्ताशी निगडीत त्रास होऊ शकतो. तंत्रज्ञान, संशोधन यात यशस्वी होतात. पती पत्नीत ३६ चा आकडा असतो. एकमेकांना समजुन घेत नाहीत. परिस्थिती विकोपाला जाते. रागावर नियंत्रण करता आले पाहीजे.
  • अधिक ध्यैर्य दाखवणे हुशारीपणाचे द्योतक नसते. संकटात स्वतः अडकुन घेणे योग्य नाही. तरीही नशीबवान भाग्यांक आहे.



➤नोकरी मिळवण्यासाठी उपाय

दिलेल्या उपायात ईच्छाशक्तीचे संतवचनाने प्रोक्षण केलेले आहे. आपली ईच्छाशक्ती अत्याधिक बलवान ठेवा. तितका प्रभाव जलदरित्या अनुभवास येईल. 

शुक्लपक्षात एखाद्या शुक्रवारी सकाळी लवकर उठुन स्नान करावे. सोवळे - ओवळे वगैरे काही नाही. नंतर तुम्ही ज्या पेपर वर अर्ज करणार आहात तो पेपर समोर ठेवा. उत्तरेकडे तोंड करुन बसा. नंतर एका वाटीत स्वच्छ पाणी घेऊन त्या पाण्याने मोराच्या पिसाच्या मध्यभागी जो दांडा असतो त्याने कागदावर 


' ज्याचा सखा हरि त्यावरी विश्व कृपा करी ' 

हा मंत्र तीन वेळा लिहा. तसेच ' अहं ब्रम्हास्मि ' हा मंत्रही वरील मंत्राखाली तीन वेळा पाण्याने लिहावा. 

कागदावरील अक्षरे ओली आहेत तोवर एकाग्र दृष्टीने पहा. या कागदावरील मजकुर वाचणारा मोहित होऊन मला नोकरी देईल असा बलवान विचार मनात आणा. जितका हा विचार बलवान व सश्रद्ध तितकी जास्त या तोडग्याची फलश्रुती मिळेल. नोकरीतुन बडतर्फ झालेल्या व्यक्तींनी नवीन अपिले अशा कागदावरुन जरुर करावीत. कागदावरील अक्षरे वाळल्यावर तो कागद कोराच राहिल पण मंत्राने भारलेला असेल. या कागदावरुन स्व हस्ताक्षराने अर्ज करावा. स्वतः कुरिअर किंवा सुपुर्द करावा. 


➤पैसे मिळण्यासाठी प्रभावी उपाय

माझ्या सर्व लिखाणातुन या विषयावरअनेक तोडगे दिले आहेत.  त्यात ' ॐ नमो विष्णवे नमः '  या मंत्राचा जप व नागकेशराची उपासना फार प्रभावी आहे असा अनेक वाचकांचा अनुभव आहे.  

धनदा यंत्राचा शेकडो लोकांना अनुभव आला आहे.  या ठिकाणी पैसे घरात टिकण्यासाठी एक अनुभुत तोडगा सांगतो.  यासाठी तुम्हाला रस्त्यात वैगेरे एखादे नाणे सापडण्याची आवश्यकता आहे.  नाणे तुम्हालाच सापडले पहिजे.  मित्रास वगैरे सापडलेले नाणे उपयोगी पडणार नाही.  असे सापडलेले नाणे घरात जपून ठेवावे.   गुरुपुष्पामृताच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे.  ही उपासना सूर्योदयाच्या आत संपली पाहिजे.  त्या दिवशी स्नान  करून एखाद्या छोट्या वाटीत अगर तबकडीत ते नाणे देवासमोर ठेवावे. त्याला पंचामृती स्नान घालून ते परत वाटीत अगर तबकडीत ते देवासमोर ठेवावे.  त्याला पंचामृती स्नान घालून ते परत वाटीत ठेवावे.  स्नान घालताना अघमर्षण सूक्त म्हणता आले तर अवश्य म्हणावे,  येत नसेल तर " ॐ नमो विष्णवे नमः " या मंत्राचा जप करावा.  नंतर नाण्याला गंध, फूल, हळदकुंकू वगैरे उपचार नेहमीसारखे करावेत.  धूपदीप ओवाळावा, नंतर ते नाणे उजव्या हातात घेऊन डोळे मिटावेत व " ॐ नमो विष्णवे नमः "  हा मंत्र 108 वेळा जपावा.  

जप करताना शक्य तो मन एकाग्र करावे व मंत्राकडे लक्ष ठेवावे.  जप संपल्यावर नाण्याला साळीच्या लाह्या व बत्ताशाचा नैवेद्य दाखवावा.  नाणे एका पिवळ्या कागदात ठेवून त्याची घट्ट पुडी करावी व तीही पिवळ्या कापडात  घट्ट शिवून पैशाच्या पाकिटात पैशाच्या डब्यात अगर गल्ल्यात ठेवावी.  जो पर्यंत पुडी वरील ठिकाणी आहे तोपर्यंत पैसा टिकून राहील.  जरी श्रीमंती आली नाही तरी पैसा टिकून राहतो हे सत्य.  हा अगदी सोपा व प्रत्येक व्यक्तीने करून पाहण्यासारखा तोडगा आहे.


➤दारिद्र्याने पीडलेल्या भगिनींसाठी :

दारिद्र्य चिंतेने पीडलेल्या अनेक भगिनी समाजात आहेत.  मोठा प्रपंच व पतीचे अल्प उत्पन्न यामुळे त्यांना नित्याच्या गरजाही भागविणे कठीण होते.  स्वतः अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना काही उद्योग, नोकरीही करता येत नाही.  अशा भगिनींनी ईश्वराची काही उपासना केली तर त्यांच्या कृपेने घरात लक्ष्मी येते असा अनुभव आहे.  दारिद्र्य विमोचनार्थ अनेक तोडगे मी दिले आहेत.  आणखीही एक प्रभावी उपासना खाली देत आहे.

जसा विचार तशी घटना घडते हा मानसशास्त्राचा सिद्धांत.  यासाठी भगिनींनी ही उपासना सुरू करण्यापूर्वी सुमारे एक महिना नेहमी असा विचार ठेवावा की काहीतरी अगम्य रीतीने मला खूप पैसे मिळणार आहेत.  रोज रोज हा विचार मनात आल्यामुळे ती बलवान व प्रवाही होऊन अंतर्मनात जाणे शक्य आहे.  ही विचारकृती कालांतराने मूर्त स्वरूपात येईल यात शंका नाही,  

भगिनींनी या योगक्रियेचा अनुभव घेऊन पाहण्यास काहीच हरकत नाही.  एक महिना अशा अवस्थेत राहिल्यावर शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत रोज पुढील व्रत करावे :  एका शुभ्र कागदावर केशराने चंद्राची कोर व शनीची आकृती काढावी.  चंद्राच्या वरील भागात शनीची आकृती असावी.  शनी ला कंकण काढावे.  नंतर एका पाटावर तांब्या ठेवून त्यात एक रुपयाचे  नाणे ,  मूठभर गहू,  पाव वार कापड , एक हिरडा व मूठभर नागकेशर घालावे.  तांब्यावर तो कागद ठेवून सुवासिक फुलाने पाणी शिंपडावे.  नंतर कागदाला गंध, फूल व हळदकुंकू वहावे.  साजूक तुपाचे निरांजन व सुवासिक उदबत्ती ओवळावी.  

खोबऱ्याच्या वाटीत पाच खारका घालून त्या तांब्यासमोर ठेवून त्यांचा नैवेद्य  दाखवावा.  कागदावर हात ठेवून  "ॐ नमो विष्णवे नमः "  या मंत्राचा 108 वेळा एकाग्र चित्ताने जप करताना डोळे मिटून घ्यावेत म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते.  जप संपल्यावर निरांजनाकडे एकाच दृष्टीने 2-3 मिनिटे पाहावे.  ज्योतीत तुम्हाला अनेक वेळेला काही दैवी आकृती दिसतील,  इतके झाले म्हणजे उपासना संपली असे समजावे.  असे व्रत आठ दिवस करावे.  या आठ दिवसांत उपास करण्याची जरुरी नाही.  फक्त जेवणात कांदा व लसूण नसावी.  सात दिवस व्रतस्थ राहावे व शक्यतो कोणाशी बोलू नये.  आठव्या दिवशी जेवणात काही पक्वान्ने करावे व त्याचा देवाला नैवेद्य दाखवावा.  आठ दिवस पूर्वेकडे तोंड करून झोपावे.

हे व्रत केल्यावर तुमच्या पती ला अगर तुम्हांला अगम्य रीतीने पैसे मिळविण्याचे योग येतील.  तुम्ही काहीही उद्योग केलात  तर त्यात आर्थिक यश येऊन तुमचा संसार मंगल होईल.  या उपासनेत शनीचंद्र युती व भगवान विष्णूचे आवाहन आहे.  जेथे विष्णू तेथे लक्ष्मी या न्यायाने ही उपासना केल्यास तुमच्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य  शाश्वत होऊल, हे त्रिवार सत्य.


➤श्री काळभैरव विशेष साधना

सकाळी सहा वाजल्यापासुन ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर तीन तासांनी पृथ्वीतलावरुन "अनाहत रुद्र नादोक्त ब्रम्हांडीय नामप्रवाह" हजारो साधकांच्या माध्यमातुन आपण "आत्मा" ते सुर्यस्थित "परमात्मा" यांमधे ब्रम्हांडीत उर्जेच्या रुपात फार मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत आहे. त्या प्रवाहात कोणत्याही ईच्छ्या आकांशा न ठेवता मीसुद्धा सहभागी होत आहे. अशी प्रबळ धारणा तयार करा.

सकाळी सहा वाजल्यापासुन ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर तीन तासांनी पृथ्वीतलावरुन "अनाहत रुद्र नादोक्त ब्रम्हांडीय नामप्रवाह" हजारो साधकांच्या माध्यमातुन आपण "आत्मा" ते सुर्यस्थित "परमात्मा" यांमधे ब्रम्हांडीत उर्जेच्या रुपात फार मोठ्या प्रमाणात प्रवाहीत होत आहे. त्या प्रवाहात कोणत्याही ईच्छ्या आकांशा न ठेवता मीसुद्धा सहभागी होत आहे. अशी प्रबळ धारणा तयार करा.

मनात नाम धारणा कशी करावी ?

"सुर्यलोकस्थित थोर सिद्ध महासिद्धपुरुषांना आपली आत्मजाणीव पोहोचणे हेतु मी साधना करीत आहे, या सुदृढ भावनेने पुर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मानसिक सेवा स्वतः दत्त महाराजच करवुन घेत आहेत" अशी धारणा करा. सुरवातीस एक महीना ही नामसाधना करुन अनुभव घ्या.

आपण सर्व भुतलावरील नश्वर जीव आणि सुर्यस्थित परमेश्वर शिव यातील अंतर भरुन काढणे हेतु ही साधना आज प्रकाशित करत आहे. आपली नाळ अर्थात आपल्या आत्म्याची नाळ त्या सद्गुरु दत्तात्रेय स्वामींमहाराजांच्या चरणकमळांशी असलेल्या परमात्म्याशी जोडलेली असते ती गाठ ब्रम्हगाठ होणे हेतु ही सुक्ष्म साधना लिहीत आहे.

साधना नाम मंत्र व विधी -

दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन श्री स्वामी समर्थ रात्रप्रहर सामुदायिक सेवामाध्यमातुन SPIRITUAL UBUNTU सामुदायिक सेवा ६ वेळचक्रात षट् म्हणजे ६ चक्रशुद्धीकरण हेतु दिवसभरातून ६ वेळा सामुहीकस्तरावर फक्त १ माळ जप १७०० हून अधिक साधक करत आहेत.

दररोज सकाळी ६ वाजल्यापासुन ते रात्री ९ वाजेपर्यंत दर तीन तासांनी फक्त तीन मिनिटांसाठी खालील धारणायुक्त नाममंत्र जप करणे

🔵 प्रथम मंत्र... ll ॐ काळभैरवाय नमः ll

🔵 द्वितीय मंत्र... Il श्री स्वामी समर्थ ll

🔘आध्यात्मिक ऊबंटू नित्य वेळ. ( रेडीओ टाईम )


  • सकाळी... ६ वाजता ठिक🕕 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • सकाळी... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • दुपारी... १२ वाजता ठिक🕛 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • दुपारी... ३ वाजता ठिक🕒 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • संध्याकाळी... ६ वाजता ठिक🕧 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज
  • रात्री... ९ वाजता ठिक🕘 ( १ माळ अथवा सरासरी वेळ )दररोज


▶सामुहीक प्राथनेसाठी स्थानबंधन नाही.
▶सामुहीक प्रार्थनेसाठी परिस्थितीबंधन नाही.


👉👉👉वेळ चुकली सामुहीक सेवा चुकली. 

सर्वच साधनावेळा दररोज १००% पाळल्या जाव्यात असेही बंधन नाही. यथाशक्ती जे सहज शक्य आहे तसे करणे.


➤श्री यंत्र लक्ष्मीवर्धक साधना

महत्त्वाची सुचना : श्री यंत्राची अचल प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय कोणत्याही पुजा पाठाचा काहीही उपयोग होत नाही. 

श्री यंत्र सोने, चांदी, तांबे या धातुंवर काढलेले असावे. पुष्कराज, मर्कत, वज्रमणी, वैंडूर्य, नीलम, स्फटीक, पाचु ईत्यादी रत्नांपासुन बनवलेले असावे. पाट, फळी, भिंत ठिकाणी काढु नये. 



यंत्र धातुचे असल्यास त्याचे वजन १ ते ७ तोळे इतकेच असावे. रत्नाच्या यंत्राला वजनाचे बंधन नाही. 

श्री यंत्रावरील कोरलेल्या रेखा चंदन व कुंकुने भरुन घ्याव्यात. श्री यंत्र हे गुरुकडून घ्यावेत. ते ज्या पद्धतीचे असेल त्याप्रमाणे त्याची पुजा त्रिशती, खड्गमाला किंवा श्री ललिता सहस्त्रनाम यांचे पठण करुन कुंकुमार्चनयुक्त करावी.

स्त्रियांना सौभाग्यवृद्धीसाठी या श्री यंत्रावर लक्ष्मीचे नाव घेऊन कुंकूमार्चन करावे. 

श्री यंत्रावर रोज किंवा कमीतकमी अष्टमीला श्री सुक्ताचा अभिषेक केल्यास यंत्रातील देवता जागृत राहतात. 

धनप्राप्तीहेतु श्री सुक्त उपासना 

अष्टमीला श्री सुक्ताचा अभिषेक करत असताना पुढीलप्रमाणे श्री सुक्ताचा उपयोग केला जातो. ज्यांना लक्ष्मीप्राप्ती हवी आहे त्यांनी रोज सायंकाळी श्री सुक्ताचा पाठ करावा. 

श्री सुक्तामधे १६ श्लोक आहेत जे थोड्या दिवसातच सहज मुखोद्गद होण्यासारखे आहे. श्री यंत्राच्या ध्यानधारणेने मानसपुजा साधता आली तर अधिक चांगले...!

१. आवाहन , २. आसन प्रदान , ३. पाद्यपुजा ४. अर्घ्य देणे ५. आचमन ६. स्नान घालणे ७. पंचामृताने स्नान घालाणे ८. देवीला वस्त्र अर्पण करणे ९. देवीला हळद कुंकू अत्तर लावणे १०. फुले वाहणे ११. धूप दाखवणे १२. दिप दाखवणे १३. नैवेद्य दाखवणे १४. तांबुल दक्षिणा देणे १५. फलसमर्पण करणे १६. क्षमा याचना करणे. असे सोळा उपचार आहेत. 

श्री सुक्त संस्कृत मधे असले तरी अवघड नाही. गरज वाटल्यास सुरवातीला एखाद्या जाणकाराकडून उच्चार जाणुन घ्यावेत. हे म्हणत असताना घरात मांगल्य व भरभराट होते हे अनुभवले पाहिजे.

आजारी लोकांसाठी ' ललिता सहस्त्रनाम '

श्रीयंत्रासमक्ष हे सहस्त्रनाम दररोज वाचणे शक्य नसले तरी दर महिन्याच्या संक्रांतीला, आपल्या जन्म तिथीला तसेच शुक्ल अष्टमी, चतुर्दशी व पौर्णिमेस अवश्य वाचा. 

तयार होणारी विभुती अथवा भस्म आजारी व्यक्तीच्या कपाळी लावावे व थोडे खाण्यासही द्यावे. ह्दयरोगावर हे भस्म रामबाण आहे. 


➤बाहेरच्या बाधेवर जालीम उपाय

हा प्रयोग अमावस्येच्या रात्री करावयाचा असतो.  प्रथम रेशमाचा काळा दोरा आणून दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा.  तो दोरा हातात घेऊन मूठ मीटा.  दोरा दिसता कामा नये.  नंतर डोळे मिटून " ॐ चैतन्य भूतनाथाय नमः " हा मंत्र 108 वेळा जपावा.  तो रेशमाचा दोरा बाधा झालेल्या माणसाच्या दंडाला तीन वेढे  देऊन बांधा.  

रात्री त्याच ठिकाणी एका पाटावर काशाची मोठी वाटी ठेवा व तीत अर्ध्याच्यावर पाणी घाला.  वाटीच्या खाली कावळ्याचे एक पीस ठेवावे.  नंतर बाधा झालेल्या माणसाच्या दंडातील दोरा काढून तो त्या वाटीतील पाण्यात टाकून द्यावा.  बिब्याचे सात थेंब टाकलेल्या तेलाचा दिवा लावा.  नंतर औदुंबराच्या तीन काड्या घेऊन त्या अडकीत्याने सारख्या करा.  त्यातील पहिली काडी घेऊन ' ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून ती काडी वाटीत टाका.  

दुसरी काडी घेऊन ' ॐ गोरक्षनाथाय नमः  या मंत्राचा 108 वेळा जप करून, ती काडी वाटीत टाका. तिसरी काडी हातात घेऊन ' ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः '  या मंत्राचा 108 वेळा जप करून ती काडीही वाटीत टाकून द्या.  ही क्रिया चालू असताना बाधा झालेला मनुष्य त्या ठिकाणी असू नये.  नंतर त्या वाटीत निळ्या रंगाची थोडी फुले टाकावीत.  वाटीसमोर धूप घालावा.  नंतर वडाच्या एका पानावर थोडासा दहीभात ठेवून त्यावर गुलाल टाकावा.  हे पानही वाटीत ठेवावे .  मग ती वाटी, काड्या व दहीभात हे सर्व उचलून आपल्या घरापासून दूरवर कोठेही टाकून द्यावे.  वाटीही टाकून द्यावी.  घरी आणू नये.  

बाहेरची बाधा नाहीशी होऊन ती व्यक्ती परत सावध होईल हे सत्य.  दंडातील काळ्या दोऱ्यात मंत्रोच्चारामुळे पिशाच्च जाते व ते रेशमी वाटीतील पाण्यात टाकल्यामुळे ते पाण्यात शिरते.  मंतरलेल्या काड्या पाण्यात टाकल्यामुळे ते भूत तडफडते.  दहीभाताच्या नैवेद्याने ते शांत होते.  अशा रीतीने ते वाटीबरोबरच घराच्या बाहेर जावे असा शास्त्रसंकेत आहे. करणी वगैरे  झालेल्या व्यक्तींनाही त्वरित अनुभव येतो.  करणी करणाऱ्या माणसास या प्रयोगामुळे भयानक शारीरिक यातना होतात व त्याला उपासमारीने मृत्यू येतो.


➤आजारीपणावर प्रभावी तोडगा

घरात कोणी जास्त आजारी झाला ( Serious ) तर वार वगैरे न पाहता ताबडतोब वडाच्या झाडाची एक इंच लांबीची मुळी आणावी. 

महत्त्वाची सुचना - 

अदल्या दिवशी संध्याकाळी बत्ताशे, कणकेचा दिवा प्रज्वलित करुन वृक्षस्वामीकडे निवेदनात पुढील ओळी म्हणाव्यात.

हे वटवृक्षराजा, मी उद्या सकाळी सुर्योदयाअगोदर येऊन तूझी मुळी घेऊन परोपकारासाठी जाणार आहे. तर तु अनुमती दे व मुळीतुन सोबत ये. 

ती स्वच्छ धुवून तिची नेहमीप्रमाणे पुजा करावी. धुपदीप ओवाळावा. नंतर पुर्वेकडे तोंड करुन ती मुळी सुर्यास दाखवुन उजव्या हाताच्या मुठीत धरावी व खालील मंत्र ११ वेळा म्हणावा.


सूर्यSरश्मि l हरिSकेशः l
पुरस्तात सविता ज्योतिः ll


( ऋग्वेद मंडळ १० सूक्त १३९ )

नंतर ती मुळी हळदिने पिवळ्या केलेल्या दोर्याने आजारी व्यक्तीच्या डाव्या पायास बांधावी. गंडांतर कुयोग टळुन ती व्यक्ती पुर्ण बरी होईल. सुर्यातील अमाप प्राणशक्ती मुळीत आकर्षित होऊन ती आपला प्रभाव दाखविते. मुळी बांधल्यावर आजारी माणसास औषधाचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. असा अनुभव आहे. 

आजारी व्यक्ती स्वस्थ झाल्यास ; आणलेली ती मुळी परत त्या वृक्षाच्या मातीत जशीच्या तशी पुरुन टाकावी. ज्या व्यक्तीने काढली तीच व्यक्ती परत करेल. दुसरी नाही. हे लक्षात ठेवा. 

मुळी परत केल्यावर हात जोडुन वड देवतेला कृतज्ञता व्यक्त करा. 


➤एखाद्या व्यक्तीवरील करणी उतरण्यासाठी उपाय

गुरुवारी सकाळी औदुंबराची वीतभर लांबीची एक फांदी आणावी.

महत्त्वाची सुचना - 

अदल्या दिवशी संध्याकाळी केसरयुक्त तुपाचा गोड शिरा, तुपाचा दिवा प्रज्वलित करुन औदुंबरस्वामींकडे निवेदनात पुढील ओळी म्हणाव्यात.

हे सद्गुरु देवा, मी उद्या सकाळी सुर्योदयाअगोदर येऊन तूमची फांदी घेऊन जाणार आहे. तुम्ही अनुमती द्या व फांदीतुन सोबत यावे असे श्री चरणी कृतज्ञतेने निवेदन ठेवतो. 

ब्रम्ह मुहुर्तात वृक्षापाशी जाऊन कोणतेही धातुचे हत्यार न वापरता ; हातानेच फांदी तोडावी.

दोन तीन वार लाल रंगाचे रेशीम त्या फांदीस गुंडाळावे व त्याची नेहमीप्रमाणे पुजा करावी. धुपदीप ओवाळुन त्या फांदीवर उजवा हात पालथा ठेवावा व " ॐ नमो दत्तात्रेयाय नमः " या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. नंतर नवनाथ चरित्रातील गोरक्षजन्माचा ९ वा अध्याय वाचुन फांदिला गुंडाळलेले लाल रेशीम तिहेरी करुन कंबरेस करागोट्या सारखे बांधावे. 

दर गुरुवारी एकभुक्त राहावे व कांदा लसुण खाऊ नये. गुरुवारी वरील दत्त मंत्र १०८ वेळा स्नानानंतर जपावा. करणीची बाधा महिन्याभरात नष्ट होईल. या तोडग्यात लाल रेशमात श्री दत्तात्रेय स्वामी महाराजांचे प्रोक्षण आहे व नवनाथ चरित्रातील ९ वा अध्याय वाचल्यामुळे भगवान गोरक्षनाथ भक्तांचा सांभाळ करतात. हि उपासना फक्त एकदाच करावी. उपवास मात्र दर गुरुवारी करावा. 

स्वतःला ' श्री दत्त ' नामस्मरणात गुंतवुन ठेवावे. सद्गुरुमहिमा परमअगाध आहे. 


➤उग्र साधना

उग्र साधना व्यक्ती विशेष माहात्म्य परखून दिली जाणार... ईथे लिहीत नाही.


➤शिवस्वरोदय नादब्रम्ह साधना

मनाची अतिचंचलता व जन्मापासुन मृत्यूपर्यंत होणाऱ्या श्वास प्रश्वासाचे चलायमन यातील सुक्ष्म बंध व संतुलनात्मक प्रयोजन मनुष्य नाशवंत बहिर्मुखी विषयोपभोगी स्वभावाला अनुसरुन कधीही यत्किंचितही आत्मसात करु शकत नाही. मनाच्या भटकावावर शाश्वत विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या चित्ताला योग्य प्रगाढ दिशानिर्देशने प्राप्त होणे आवश्यक आहे.

मनाची अतिचंचलता व जन्मापासुन मृत्यूपर्यंत होणाऱ्या श्वास प्रश्वासाचे चलायमन यातील सुक्ष्म बंध व संतुलनात्मक प्रयोजन मनुष्य नाशवंत बहिर्मुखी विषयोपभोगी स्वभावाला अनुसरुन कधीही यत्किंचितही आत्मसात करु शकत नाही. मनाच्या भटकावावर शाश्वत विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या चित्ताला योग्य प्रगाढ दिशानिर्देशने प्राप्त होणे आवश्यक आहे. या हेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन संस्थेच्या संबंधित सभासदांसाठी सदर अभिलेख प्रकाशित करत आहोत.

शिवस्वरोदय आध्यात्मिक योग संधान म्हणजे काय ?

शिवस्वरोदय यातील प्रार्थमिक शब्दशः अर्थ शिव + स्वरः + उदय असा असला तरीही यातील अंतरिक सुक्ष्म मतीतार्थ प्रत्यक्ष कृतीतुनच अनुभवास येतो. या अनुशंघाने शिवस्वरोदयाची अभिव्यक्ती जन्मोजन्मी सहज घडून येणाऱ्या ईडा व पिंगला नाड्यांमार्फत होणाऱ्या श्वासप्रश्वासच्याही पलिकडील आत्मिक संवेदना आहे. अर्भकावस्थेतील शव अथवा स्थुल शरीराला प्राप्त होणाऱ्या हंसः सोहं अजपाजपाची अंतरिक सुक्ष्म योगक्रीया शवापासुन प्राप्त होणाऱ्या श्वासप्रश्वासाला शिवापर्यंत घेऊन जाणाऱ्या श्वासात्मक स्वर शक्तीला शिवस्वरोदय असे म्हणतात.

दत्तप्रबोधिनी योगतत्वात ( दत्ततत्व + कर्मदहन + आध्यात्मिक साधना ) + ( अष्टांग योगादी हठयोग ) + ( जनहीतार्थ दत्त माहात्म्य प्रसार ) या त्रिसंधानात्मक आत्मविश्लेषणाचा परिपक्व व आचरणात्मक अभ्यास होणेसाठी शिव स्वर शक्तीची प्राप्ती होणे आवश्यक आहे. शिवस्वरोदय शास्त्रातील उजवी सुर्य नाडी व डावी चंद्र नाडीचे देहातील व देहातीत तादात्म्य ओळखण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित ब्लाँगवरील प्रार्थमिक तात्त्विक लिखाणांचा संघर्षपुर्ण अभ्यास व निरंतर सराव केल्यास आपल्या अभिव्यक्तीतुन संस्थेच्या सक्रीय सभासदत्वाच्या माध्यमातून शिवस्वरोदय जागृत करणे शिकवले जाते. ज्यायोगे आपल्या सुक्ष्म देहाचे नाडी परिक्षणाच्या आधारावर होणाऱ्या चलायमानाचे अभ्यासपुर्ण अध्ययन करण्यात येते. 

शिवस्वरोदय शास्त्राचे सुक्ष्म शरीराला होणारे लाभ !

शव देहातील श्वासप्रश्वासाचे शिव स्वरातील परीवर्तन होण्यासाठी नाडी ज्ञानाचे देहातीत असणाऱ्या पंचकोषातुन तात्विक साधन योगतत्वाधारे केले जाते. सर्वसामान्य मनुष्याचे श्वासप्रश्वास व योगीजनांचे शिवस्वराभ्यास यात जमीन आकाशाचे अंतर असते. शिवस्वराच्या निरंतर अभ्यासाने देहातील वायुगतीचे सुक्ष्मज्ञान साधकाला होऊन त्याची अंतर्मुख वस्तुस्थिती झपाट्याने सुधारुन प्राणशक्तीचे वहन दिर्घ श्वसनमार्गाद्वारे नाकापासुन ते नाभींस्थानापर्यंत व देहात सर्वत्र व्यापलेल्या प्राणवायुरहीत व विरहीत रक्ताद्वारे अथर्व चित्तातुन तत्व घटकाच्या माध्यमातून सुत्रसंचलन अनुभवास येते. यातील परीपक्वतेच्याच आधारावर दत्तप्रबोधिनी साधक पंचमहाभुतापलिकडील निर्गुणावस्थेत स्थिर होऊन परमपदासाठी अग्रेसर होतो.

शिवस्वरोदयाची परिभाषा म्हणजे ; स्थुल शवाच्या श्वासप्रश्वासाला देण्यात येणाऱ्या आत्मिक संधानाने श्वाछोऊच्छ्यवासाचे स्थिर स्वरात परिवर्तन करवुन घेऊन सद्गुरुंना अभिप्रेत असलेली शिवकला प्राप्त करुन घेणे जे सर्वसाधारण स्थुल देहाच्याही पलिकडे आहे. 

सुदृढ मानसिक तादाम्य प्राप्ती कशी होईल ?

मनाची अतिचंचलता व जन्मापासुन मृत्यूपर्यंत होणाऱ्या श्वास प्रश्वासाचे चलायमन यातील सुक्ष्म बंध व संतुलनात्मक प्रयोजन मनुष्य नाशवंत बहिर्मुखी विषयोपभोगी स्वभावाला अनुसरुन कधीही यत्किंचितही आत्मसात करु शकत नाही. मनाच्या भटकावावर शाश्वत विजय प्राप्त करण्यासाठी आपल्या चित्ताला योग्य प्रगाढ दिशानिर्देशने प्राप्त होणे आवश्यक आहे. या हेतुने दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातुन संस्थेच्या संबंधित सभासदांसाठी सदर अभिलेख प्रकाशित करत आहोत.

अखंड जीवनात निरंतर होणाऱ्या श्वासप्रश्वासावर आपल्या मनाचे सार्वभौम स्थैर्य अवलंबून असते. ज्याप्रमाणे माकडाची अतिचंचलता त्याच्या देहावर श्वसनक्रियेच्या माध्यमातून प्रभावकारक ठरते त्यायोगे माकडाचे जीवन लघुकाळातच संपुन जाते. म्हणजे जीव जितक्या जलद गतीने श्वसन करतात त्याचा प्रत्यक्ष परिणाम मनाची चंचलता व देहाच्या उर्जा क्षयावर होतो परिणामी आयुष्य अल्पावधीतच संपले जाते. याउलट कासवाचे स्थिर चित्त व श्वासात्मक वहन दिर्घ स्वरुपाचे असल्याने त्यांची जीवन मर्यादा सर्व प्राणीमात्रांपेक्षा अत्याधिक असते. 

वरील उदाहरणाचे व्यवस्थिक आकलन केल्यास आपली जीवनशैली व होणाऱ्या क्षयाचे आत्मविश्लेषण करुन श्वसनमार्गाचे स्वरमार्गात परीवर्तन करता आलं पाहीजे तेव्हाच आपण आपले अस्तित्व काळ व वेळेच्या भयानक ओघातुन सक्षमपणे टिकवु शकतो अन्यथा नैराश्यपुर्ण विनाश निश्चित आहे. 


➤नाम प्राणायाम

मानवी जीवनाची अंतिम शाश्वत अवस्था म्हणजे समाधी...! रामायण - नारायण - पारायण  आध्यात्मिक शृंखला जोपर्यंत आत्मपचनी येत नाही तोपर्यंत गोंधळलेली मनःस्थिती प्राणाच्या माध्यमातून आयाम अथवा विराम घेणार नाही. उर्वरीत जीवन आध्यात्मिक जीवनाच्या क्लीष्ट विचारविनीमायात अडकुन पडु नये जेणेकरुन आपला स्वहेतु साध्य होणार नाही हे टाळता यावं, यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून साधकांसाठी सरळ व सहज असे समाधी ज्ञान प्रकाशित करत आहे.

नाम म्हणजे काय ?

जीवनात कोणतेही कर्म करण्यापुर्वी संबंधित कृतीचा अर्थ ज्ञात असणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यायोगे घडत असणाऱ्या क्रिया व परिणामांची अभ्यासात्मक अवतरणिका सहजच ध्यानात येते. नाम हा शब्द आ ( शक्ती ) + नम ( धातु ) अशा संयुक्तिकरणाने त्रिपदी तत्वातुन ब्रम्हांड व्यापुनी राहीला आहे. नाम या शब्दात ' आ ' ही परमशक्ती रामायण - नारायण - पारायण या आत्मिक साधन, साध्य व समाधी अवस्थेला जोडणारी मोलाची कडी आहे. त्याचप्रमाणे ' भव ' या संसारीक विग्रहात अनुग्रहयुक्त ' भाव ' प्रकट होणेसाठी ' आ ' परमशक्तीचाच अविर्भाव होतो. नाम क्रीया सर्वसाधारण नसुन सखोल अंतरीक ज्ञानमार्ग प्रकट करणारी भगवंताची सुक्ष्म कार्यप्रणाली आहे. ही कार्यप्रणाली स्वाध्यायासाठी समजुन घेणे महत्त्वाचे असते. मनाला अवरोध उत्पन्न करवुन देणारी नामशक्ती अमृततुल्य होण्यास अधी तत्वसंधान करता आलं पाहीजे.

नाम प्राणायाम म्हणजे काय ?

मानवी जीवन हंसात्मक श्वासोच्छवासावर आधारित असते. श्वासोच्छवासाचे प्रमाण दैनंदिन जीवनात जितके जास्त तितकी मनाची चंचलता जास्त असते, परिणामी दुःखद दुर्दैवी अंत होणे स्वाभाविक आहे. याउलट मनाची चंचलता ( मना - नाम ) नाम प्राणायामातुन शमवण्याचा प्रयत्न केल्यास मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्थैर्यात वाढ होऊन आत्मबळकटीकरण होत असते. नाम प्राणायाम म्हणजे नामसंधानाच्या एकसुत्री माध्यमातून देहांतर्गत सक्रीय असणाऱ्या पंचप्राणांना आयाण अथवा आराम देणे. देहात सक्रीय असणाऱ्या एकुन अकरा रुद्रांपैकी पाच रुद्र म्हणजे प्राण, अपान, समान, व्यान व उदान हे आहेत. नाम प्राणायामाच्या माध्यमातुन प्राण व अपान यांच्या सामायिकरणावर जोर दिला जातो.

नाम प्राणायाम करण्यापुर्वी अपेक्षित असलेली पात्रता यादी खालीलप्रमाणे -


  • १. भक्तीमार्ग हाच प्रमुख मार्ग अशी पक्की धारणा असावी.
  • २. नामस्मरण अर्थयुक्त असायला हवे.
  • ३. मन, काया व वाचा एकसुत्री असावी.
  • ४. आत्मसमर्पणाची तीव्र भावना अंतरी जागृत असावी.
  • ५. सद्गुरु तत्व जाणुन घेण्याची अंतरिक उत्कंठा असावी.
  • ६. शुद्ध शाकाहारी असणे आवश्यक.
  • ७. स्वभाव अंतर्मुख असावा.


योगक्रीयेतील सावधानता

नाम प्राणायाम क्रियेची सुरवात करणे हेतु पुरक - रेचकाचे प्रमाण ठराविक स्वरुपात असते. संबंधित क्रिया करण्यापुर्वी मुलबंधाचा अभ्यास करणे महत्त्वाचे असते. मुलबंधाशिवाय प्राणायाम सिद्ध होऊ शकत नाही. त्यायोगे अपेक्षित अनुभव येण्यास अडचणीं उत्पन्न होतात. अशा नाम प्राणायामात जबरदस्तीने काहीही केल्यास योग होण्याऐवाजी रोगच बळकावतो याचे ध्यान असायला हवे. नामसंधानात्मक प्राणायाम चित्ताचे लय सर्वसाधारण प्राणायामाच्या तुलनेत अधिक जलाद गतीन करते. त्यायोगे सात्त्विक आचरण अपेक्षित आहे. सद्गुरु महाराजांच्या आत्मनिर्देशनावर आधारलेल्या नाम संधान योगक्रीयेवर आ + परा + आयण तत्व समजुन घ्यावेत.

यौगिक त्रिवेणीं बंध म्हणजे काय ?

मानवी जीवनाची अंतिम शाश्वत अवस्था म्हणजे समाधी...! रामायण - नारायण - पारायण  आध्यात्मिक शृंखला जोपर्यंत आत्मपचनी येत नाही तोपर्यंत गोंधळलेली मनःस्थिती प्राणाच्या माध्यमातून आयाम अथवा विराम घेणार नाही. उर्वरीत जीवन आध्यात्मिक जीवनाच्या क्लीष्ट विचारविनीमायात अडकुन पडु नये जेणेकरुन आपला स्वहेतु साध्य होणार नाही हे टाळता यावं, यासाठी दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट माध्यमातून साधकांसाठी सरळ व सहज असे समाधी ज्ञान प्रकाशित करत आहे.

नाम प्राणायामाच्या पुर्वतयारी हेतु शरीरातील प्रमुख तीन प्राण प्रदेशांचे संकुचन करण्याची योग क्रीया म्हणजे त्रिवेणी बंध. ह्या बंधाच्या माध्यमाने देहात स्वयंचलित स्वतंत्र अविर्भावित असणाऱ्या प्राणशक्तीला स्वनियंत्राणात आणले जाते. नाम साधनेच्या माध्यमातून प्राणांना सद्गुरु तत्वाने भारुन त्यांचे लय होण्याची संधानात्मक पुर्वतयारी करावी लागते. त्यायोगे त्रिवेणी बंध हा तर मुळ पाया आहे. या बंधात एकुण तीन बंधाचा समावेश खालीलप्रमाणे करण्यात येतो.


  • १. मुल बंध
  • २. उड्डीयान बंध
  • ३. जालंदर बंध


१. मुल बंध

मुल बंध क्रीया देहाच्या गुद् द्वारासोबत संबंधित आहे. या क्रीयेत सर्वप्रथम गुद् द्वाराची स्वच्छता, नियंत्रण व आकुंचनावर गणेशक्रीयेच्या माध्यमातून भर दिला जातो. देहाच्या गुद् द्वाराच्या दोन अंगुल आत सुक्ष्म शिवलिंगाला साडेतीन वेटोळे मारुन आदी अनादी काळापासुन स्वतःची शेपुट स्वतःच्याच तोंडात घट्ट धरुन आदीमाया कुल कुंडलिनी माता योगनिद्रावस्थेत पडुन असते. सुदृढ मुलबंध क्रीयेने नाम प्राणायामाच्या आत्मसंधानने ही महा कालसर्पिणी योगशक्ती मेलेल्या सापाप्रमाणे स्वतःचे वेटोळेसोडुन अगदी सरळ होते. त्यायोगे तीची परमशक्ती स्वाभावाविकपणे सुषुम्ना मार्गात प्रवाहीत होण्यास सुरवात होते. या संबंधि आत्मसंकेतही साधक करवून घेत असतात. मुल बंध योगक्रीयेने अपान वायुचे उर्ध्वगमन होत असल्याने संबंधित वायुचा स्वनाभीस्थावनावर मोठा प्रभाव पडतो.

२. उड्डीयान बंध

नाभी प्रदेशातील अधोमुखी अमृतकलश उर्ध्वमुखी होणे हेतु संबंधीत बंधाचा वापर करण्यात येतो. यांसंबंधी अधिक माहीती पुढील लेखनात प्रकाशित करण्यात येईल.

३. जालंधर बंध

विशुद्धी चक्रस्थित भागास आपल्या हानुवटीने दाबुन धरणे यांस जालंधर बंध लावणे असे म्हाणतात. ह्या बंधाच्या आकुंचनाने सहज कुंभक अवस्था येऊ लागते. जेणेकरून प्राण कायमस्वरुपी स्थिर होतो. यासंबंधी अधिक माहीती आपण पुढील लेखनात प्रकाशित करु.

नाम प्राणायम स्वतःच्या प्रकृती पुरुषाला अनुसरुन कसं करावं ? त्रिवेणी बंध कसा साधावा यासाठी संबंधित योग क्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान अपेक्षित असल्यास दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट शी संपर्क करणे.


➤खाजगी व गूप्त कार्यसिद्धी साधना

ह्या प्रकारच्या साधना ; साधकांना देहस्थित होऊन मार्गदर्शनाखाली कराव्यात. यासाठी समक्ष भेटूनच सभासदांने शंकानिरसन करवुन घ्यावे.


➤दत्तप्रबोधिनी लेखनात्मक संधी

मानसिक, सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक स्थैर्य प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून दत्तप्रबोधिनी ब्लाँगवर शेकडो बहुमुल्य व प्रात्यक्षिक लिखाणे प्रकाशित केली जात आहेत. ह्या लिखाणांना सामाजिक माध्यमातुन योग्य वर्गीकरणाच्या माध्यमातुन हितोपयोगी वळण मिळावं ; त्याच बरोबर नवनवीन सद्विचार व अनमोल मार्गदर्शन पुस्तकी स्वरुपात उपलब्ध व्हावं यासाठी दत्तप्रबोधिनी प्रकाशनाची स्थापना करण्यात आली.

दत्तप्रबोधिनी प्रकाशनाद्वारे यापुर्वी कधीही व कोणीही उपलब्ध करुन न दिलेले असे स्वयंभु दत्त तात्विक आँन लाईन व आँफ लाईन आध्यात्मिक व्यास पीठ; आध्यात्मिक साधकांसाठी खुले करण्यात आहे आहे. ज्यायोगे साधक दैनंदिन जीवनगतीतुन अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात पुस्तकी शब्दांच्या माध्यमातुन सविस्तर कार्यप्रणाली विस्तारीत रुपात समजवुन घेऊ शकता.

दत्तप्रबोधिनी प्रकाशनाद्वारे संस्थेतील सक्रीय सभासदांना येणाऱ्या लिखाण कौशल्यातुन वर्तमान व भवितव्यातील सर्वांगीण स्वामी जनहीत साध्य होत आहे. ज्यायोगे दत्त संप्रदायात दत्त विभुतींद्वारे प्रत्यक्षदर्शी संजीवन समाधीयुक्त आत्मिक मार्गदर्शन घेण्याची पुर्वानुग्रह आत्मस्थिती दत्तप्रबोधिनी लेखकांना प्राप्त आहे. 

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक पुस्तके वाचण्यापुर्वी आवश्यक असलेली मानसिकता काय आहे ?

दत्त प्रभुंच्या दास्यभक्तीद्वारे प्रकट होणाऱ्या शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्हाचे अवतरण अनुभवण्यासाठी प्रारंभीक स्वरुपात मनाला सद्गुरुंची गोडी असायला हवी. ह्या अंतरिक गोडव्यातुनच संबंधित सुक्ष्म क्रियेबद्दल अंतर्मुख जिज्ञासा प्रकट होते. जिज्ञासेतुनच कृतीची परिभाषा प्रकट होते. कृती घडल्यानंतरच सद्गुरु कर्म अनुभवाला येतात. या सद्गुरु कर्माला ; दत्त कर्म जे अकर्म आहे असे म्हणतात. 

त्यायोगे मनाला दत्तभक्तीच्या दृढ निश्चयाशी गाठ बांधा. महाराज एक दिवस हिच गाठ दास्यभक्तीतुन ब्रम्हगाठ करतात. म्हणजेच शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्ह व्हाल. यासाठी अगोदर शब्द ब्रम्ह असायला पाहिजेत त्यासाठी दत्तप्रबोधिनी पुस्तके वाचावीत.

दत्तप्रबोधिनी आध्यात्मिक पुस्तके वाचल्यानंतर पुढील आत्ममार्ग क्रमण काय आहे ?

शब्द ब्रम्हातुन शुद्ध ब्रम्हाकडे आत्मप्रयाणाच्या लागलेल्या गोडीला व प्राप्त होणाऱ्या विलक्षण मनःशांतीत उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी खालीलप्रमाणे पर्यायी मार्ग आहेत. 


  • १. पुस्तकाद्वारे प्रकट होणाऱ्या प्रश्नांना आपल्या आध्यात्मिक पब्लिक फोरम वर विचारावेत ; संबंधित जाणकार उत्तरे देतील.
  • २. दत्तप्रबोधिनी संस्थेत सभासद होऊन संस्थेच्या कम्युनिटी फोरमवर प्रश्न विचारावेत. संबंधिक साधक वर्ग उत्तरे देतील.
  • ३. दत्तप्रबोधिनी संस्थेत सक्रीय सभासद होऊन श्रीमद् परमहंस थोरले स्वामीं महाराज अनुग्रहीत श्री. कुलदीप निकमदादांना प्रश्न विचारुन उपस्थित झालेल्या सर्व शंकांचे यथाशक्ति निरसन करवुन घ्यावेत. 


दत्तप्रबोधिनी पुस्तकाद्वारे कोणतेही संसारिक व्यक्तिमत्त्व ; सद्गुरुकृपे आध्यात्मिक चारित्र्याला अनायासे प्राप्त होणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपल्या आवडीच्या विषयांतर्गत योग्य ते प्रभुत्व मिळवण्यासाठी सदैव प्रामाणिक व पारदर्शक मेहेनत करावी. भगवान दत्तप्रभु स्मतृगामी आहेत. त्यांनी तुम्हाला स्वीकारावं असं वाटत असेल तर दत्त संस्कारक्षम व्हा. मानवी जीवन खुराड्यातच राहातं ; वेळेचा सदुपयोग मानवाला योग्य वेळी बचाव पक्षी मदत करतो. त्यासाठी अधी बरचसं पेरावं लागतं.

➤Online Community Support 24X7